Join us

नवाजुद्दीन सिद्दीकी सांगतो, मराठीमध्ये वर्ल्ड क्लास चित्रपटांची निर्मिती होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 13:33 IST

बॉलिवुडचा तगडा कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी हा हरामखोर या चित्रपटामुळे खूपच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच ...

बॉलिवुडचा तगडा कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी हा हरामखोर या चित्रपटामुळे खूपच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या बॉलिवुडच्या कलाकाराने यापूर्वीदेखील अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहेत. त्याने सरफरोश, पिपली लाइव्ह, कहानी, तलाश, किक, बदलापूर, बजरंगी भाईजान, तीन असे अनेक चित्रपट बॉलिवुड इंडस्टीला दिले आहेत. आता प्रेक्षकांचा हा लाडका कलाकार हरामखोर या बॉलिवुड चित्रपटामध्ये पाहायला मिळणार. बॉलिवुड चित्रपटाप्रमाणेच या कलाकाराला मराठी चित्रपटसृष्टीविषयी काय वाटते असे एका मुलाखतीत विचारण्यात आले असता. तो म्हणाला, सध्या मराठी चित्रपटसृष्टी भरारी घेत आहेत. या चित्रपटसृष्टीमध्ये खूप सक्षम कथा असणारे चित्रपट पाहायला मिळत आहे. ही इंडस्टी वर्ल्ड क्लास चित्रपटांची निर्मिती करत आहे. त्यामुळे या चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच करेन. त्याचबरोबर मराठी रंगभूमीदेखील माझ्या अगदी जिव्हाळयाची आहे. मी बºयाच वर्षापासून मराठी नाटक पाहत आहेत. घाशीराम कोतवाल, सही रे सही महापरिनिर्वाण ही मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर नाटकं आहेत. मराठी नाटकांमुळेच माझ्यावर संस्कार झाले आहेत. या नाटकांचा माझ्यावर प्रभाव असल्याचेदेखील तो यावेळी म्हणाला. नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याची बजरंगी भाईजानमधील पत्रकाराची भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्याच्या या भूमिकेचे बरेच कौतुकदेखील करण्यात आले होते. आता मात्र त्याची हरामखोर या चित्रपटात काय भूमिका असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.