Join us

नवरात्री निमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं खास फोटोशूट, वेधल सर्वांच लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 13:07 IST

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली.गेल्या काही वर्षापासून तिनं साकारलेली 'नवदुर्गा' प्रेक्षकांना भावली.

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. दरवर्षी तेजस्विनी पंडीत नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा संदेश देणारे फोटोशूट करते. या दिवसांत ती वेगवेगळ्या देवींचे रूप साकारते. देवी रूपाच्या माध्यमातून समाजातल्या आणि जगातल्या काही महत्त्वांच्या मुद्दय़ांकडे, एक माणूस म्हणून आपण करत असलेल्या चुकांकडे लक्ष वेधण्यासाठी तिचा हा प्रयत्न असतो.  विविध मार्गांनी महिलांच्या कलागुणांना, त्यांच्यातील ताकदीला सलाम करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावत आहेत. या साऱ्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरतेय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत.

 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली.गेल्या काही वर्षापासून तिनं साकारलेली 'नवदुर्गा' प्रेक्षकांना भावली. नवरात्रीचा आजचा पहिला दिवस म्हणजचे पहिली माळ,म्हणूनच तेजस्विनी आजचा पहिला लूक शेअर केला आहे. यंदा तिने फारंच महत्त्वाचे विषय या फोटोशूटमधून हाताळला आहे. 

यंदाही तिने नवरात्रीनिमित्त खास नारीशक्तीचा जागर करणारे फोटोशूट केले आहे. यंदाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिने हे फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोत डॉक्टरच देव असल्याचे असेच काहीसा सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीत डॉक्टरच देव आहेत, असा दृष्टांत अनेकांना झाला असेल. त्यामुळे तेजस्विनीचे हा फोटोही खास ठरतोय.

फोटो शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला...''अन मग मी सोडून त्रिशूळ भाला, हाती, stethoscope धरला...घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस,आईच उभी आहे PPE किट मागे, विसर त्याचा पाडू नकोस,विसर त्याचा पाडू नकोस.'' 

टॅग्स :तेजस्विनी पंडित