Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: सध्याच्या काळात सोशल मिडिया आणि ट्रोलिंग हे जणू एक समीकरण झालं आहे. फक्त सर्वसामान्य माणूसच नाहीतर कलाकार मंडळींना देखील सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकारांच्या चांगल्या कामाचं जितकं इथे कौतुक केलं जातं. त्यापेक्षा अधिक आता ट्रोल केलं जातं. मराठीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकरांना सुद्धा या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.अशातच नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकरांचा सहकलाकार नवरा माझा नवसाचा फेम अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर अनेक कलाकरांना या मुद्द्यावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली होती. अभिनेते विकास समुद्रे यांनी सचिन यांच्यासोबत नवरा माझा सिनेमात एकत्र काम केलं आहे. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विकास समुद्रे म्हणाले,"सचिन पिळगावकर यांना आता ट्रोल केलं जातं. हे आधीही घडलं असतं, जर तेव्हा सोशल मीडिया असतं. शोले चित्रपटादरम्यान, सचिन पिळगावकर यांनी कशी मदत केली, हे तुम्ही आता समाजमाध्यमांमवर ऐकता. हे आम्ही २२ वर्षांपूर्वीच ऐकलं. तीच गोष्ट जर खोटी असेल, तर माणूस कट टू कट २० वर्षांनी कसं बोलेल?".
यापुढे विकास यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं,"सचिन पिळगावकर हे असे कलाकार आहेत ज्यांनी राज कपूर, गुरुदत्त यांसारख्या दमदार कलाकारांसोबत काम केलंय. लहानपणीच त्यांना अनेक अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे.गुरुदत्त यांच्यासोबत ते सिनेमा करणार होते. गुरुदत्त यांनी सांगितलं, सहा वर्षांच्या मुलाचं कॅरेक्टर आहे. पण तेव्हा सचिन पिळगावकर चार वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी अगदी प्रांजळपणे विचारलं, आप नहीं लेंगे मुझे इस सिनेमा मैं? तेव्हा गुरुदत्त म्हणाले होते, नही मैं २ साल वेट करुंगा असं म्हणाले होते.त्यांच्यासाठी हा सिनेमा थांबवला होता. दरम्यानच्या काळात गुरुदत्त यांचं निधन झालं होतं. मग त्यांच्या भावाने हा चित्रपट पूर्ण केला.सचिन पिळगावकर यांना घेऊनच त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला.त्यांना ट्रोल केलं जातं, याचं मला खरंच वाईट वाटतं". अशी प्रतिक्रिया विकास यांनी दिली.
मग ते म्हणाले,"मी खात्रीनं सांगतो, पन्नाशीतला किंवा साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत नाहीये.ही जेन-झी पिढी त्यांना ट्रोल करत आहे.कारण त्यांनी अजूनही सचिन पिळगावकर यांना नीट ओळखलेलं नाही. त्यांचा ऑरा वेगळा आहे.हिंदीतील अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत सचिन यांचं उठणं बसणं असतं. तर, त्यांचा ऑरा असणारच ना...लहानपणापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलंय.त्यांना जेव्हा ट्रोल केलं जातं, तेव्हा खरंच वाईट वाटतं', असं अभिनेता म्हणाला.
Web Summary : Vikas Samudre criticized those trolling Sachin Pilgaonkar, highlighting his early achievements and support from industry legends. He believes younger generations don't fully appreciate Pilgaonkar's legacy and aura, forged through decades in Bollywood.
Web Summary : विकास समुद्रे ने सचिन पिलगांवकर को ट्रोल करने वालों की आलोचना की, उनकी शुरुआती उपलब्धियों और उद्योग के दिग्गजों से मिले समर्थन पर प्रकाश डाला। उनका मानना है कि युवा पीढ़ी पिलगांवकर की विरासत और आभा की पूरी तरह से सराहना नहीं करती है, जो बॉलीवुड में दशकों से बनी है।