नटसम्राटची घोडदौड सुरुच .....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 06:23 IST
नाना पाटेकरांच्या अभिजत अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवणाºया नटसम्राट चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुच ...
नटसम्राटची घोडदौड सुरुच .....
नाना पाटेकरांच्या अभिजत अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवणाºया नटसम्राट चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. या चित्रपटाने देश -विदेशात आत्तापर्यंत ४० करोड रुपयांची कमाई केली असल्याची माहिती मिळत आहे. नटसम्राटच्या या सक्सेससाठी एस्सलव्हीजन या कंपनीने सर्व कलाकारांसाठी पार्टी आयोजित केली होती. यावेळी कलाकार व टेक्नीशियन्सना ट्रॉफी देण्यात आली. महेश मांजरेकर यावेळी म्हणाले, मला वाटले नव्हते कि नाना आणि माझे या सिनेमाच्या दरम्यान पटेल. आमच्यात बºयाच कारणांवरुन वाद होतील असे वाटायचे. परंतू आम्ही दोघांनीही अतिशय समजूतदारपणे काम केले. त्यामुळेच सिनेमाचे शुटिंग वेळेच्या आधीच पुर्ण झाले. सिनेमा पाहताना आम्ही खुप इमोशनल झालो असा फिडबॅक मला युएसए व इंग्लड मधील प्रेक्षकांकडुन मिळाला.