नटसम्राट नानांनी दिला अभिनयाचा गुरूमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:59 IST
व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या पाचव्या ‘वेदा’ या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत ‘नटसम्राट’ हा सिनेमा दाखविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाना ...
नटसम्राट नानांनी दिला अभिनयाचा गुरूमंत्र
व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या पाचव्या ‘वेदा’ या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत ‘नटसम्राट’ हा सिनेमा दाखविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाना पाटेकर यांनी अभिनयाबद्दल महत्त्वाच्या क्लृप्त्या सांगितल्या. एखाद्या चांगल्या अभिनेत्याकडे दिग्दर्शकाला जसं हवं आहे तसं अभिव्यक्त होण्याची क्षमता असायला हवी. अभिनेता हा भावभावनांचा खजिना असतो. त्यानं आपल्या खजिन्यातून योग्य वेळी अभिनयाचं योग्य रत्नं बाहेर काढायला हवं. एखाद्या वेळी दिग्दर्शक लोकांना फसवू शकेल पण खरा अभिनेता नाही. अशा शब्दांत नानांनी विद्यार्थ्यांना गुरूमंत्र दिला. या उपक्रमाचा भाग म्हणून अभिनय, दिग्दर्शन, नाटक-सिनेमा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘नटसम्राट’चे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि प्रख्यात कलाकार नाना पाटेकर सोबत लेखक अभिजीत देशपांडे आणि निर्माता विश्वास जोशी उपस्थित होते. चर्चा-मुलाखतीत समन्वय साधण्यासाठी स्वत: सुभाष घई यांनी पुढाकार घेतला होता.