Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नाशिकचा मी आशिक' गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 21:30 IST

केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित 'नाशिकचा मी अशिक' हे नाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देनाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे 'नाशिकचा मी अशिक'

केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित 'नाशिकचा मी अशिक' हे नाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत हा व्हिडिओ ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 

सोशल मिडियावरही 'नाशिकचा मी आशिक' गाण्याच्या टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळते आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी स्वरसाज दिला आहे. या गाण्याचे दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे.  गाण्याच्या ओळींवरूनच हे गाणे नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणार आहे हे समजून येते. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणे ध्वनिमुद्रित केले आहे. अवधूत वाडकर यांनी नाशिकच्या भव्यतेचा तसेच निसर्ग सौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकर सांगतात.

या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बिग बॉस फेम स्मिता गोंदकर तसेच काहे दिया परदेस फेम सायली संजीव, अभिनेत्री मयुरी शुभानंद आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करणार असून लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या गाण्याच्या टीझरला इतका चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल. 

टॅग्स :स्मिता गोंदकर