तुमचा-आमचा नाना मधुन उलगडणार नानांचा जीवनप्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 15:47 IST
नाना पाटेकरांच्या अफाट आणि अफलातून व्यक्तिमत्वाला जाणुन घेणे म्हणजे काही सोपे काम नाही. नानांचे जवळचे मित्र श्रीकांत गद्रे यांनी ...
तुमचा-आमचा नाना मधुन उलगडणार नानांचा जीवनप्रवास
नाना पाटेकरांच्या अफाट आणि अफलातून व्यक्तिमत्वाला जाणुन घेणे म्हणजे काही सोपे काम नाही. नानांचे जवळचे मित्र श्रीकांत गद्रे यांनी नानांचा जीवनप्रवास उलगडविण्याचे धाडस केले आहे. होय, लवकरच नानांच्या जीवनातील काही पैलु आपल्या सर्वांच्या समोर उलगडणार आहेत. नाना पाटेकर हे त्यांच्या आयुष्यात कसे आहेत हे सर्वांना आता एका पुस्तकाच्या रुपातून समजणार आहे. तुमचा-आमचा नाना... या पुस्तकामध्ये नानांच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या बºयाचशा गोष्टींचा खुलासा केलेला आहे. या पुस्तकाचे शब्दांकन साहित्यिका मुग्धा कोपर्डेकर यांनी केले आहे. नानांचे मित्र श्रीकांत गद्रे सांगतात, नाना कलाकार म्हणुन कसा घडला, त्याचा वेगवेगळ््या टप्प्यांवरील जीप्रवास कसा असेल याची उत्सुकता मला देखील होती. नानांचा कलेचं औपचारिक शिक्षण ते स्टारडम हा जीवनप्रवास एका पुस्तकाच्या स्वरुपात समोर यावा असे मला वाटले. शालेय जीवनात अगदी अंगठे धरुन उभा राहणारा नाना, मुरुड सोडुन महानगरात दाखल झालेला, क्रिकेटचे विलक्षण वेड असलेला, स्वत: शोध घेणारा, मोठा कलाकार होऊनही शेतकºयांच्या आत्महत्या पाहून नाम फाऊंडेशनची निमिर्ती करणारा अशी त्याची नाना-विध रुपे त्याच्याच गोतावळ््यातील अनेक दिग्गजाच्या लेखणीतून या पुस्तकात उवतरली आहे. रिमा लागु, रवी परांजपे, विक्रम गोखले, मंगेश तेंडुलकर, शुभांगी गोखले, सुधीर गाडगीळ, दिलीप प्रभावळकर, किशोरी अमोणकर, रविंद्र साठे, सुभाष अवचट, सुनील गावसकर, भारती आचरेकर, विकास आमटे अशा कितीतरी लोकांनी नानांचे अनेक किस्से या पुस्तकात रेखाटले आहेत. एवढेच काय तर नाना चित्रपटसृष्टीत येण्याआधी कसे होते, कसे दिसायचे याची उत्सुकता तर नक्कीच सर्वांना असणार. यासाठी नानांच्या बालपणीच्या काही खास मित्रांनी मदत केली आहे. नानांचे १ ते १७ वयोगटातील स्केचेस त्यांच्या मित्रांनी नानांचे केलेल्या वर्णनावरुन काढण्यात आली आहेत. हे स्केचेस देखील पुस्तकात वाचकांना पाहता येणार आहेत. लवकरच या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा नानांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजतेय.