Join us

नाना पाटेकर याना मिळणार जीवन गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 11:42 IST

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करणारा अभिनेता नाना पाटेकर. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराला लवकरच जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार ...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य करणारा अभिनेता नाना पाटेकर. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराला लवकरच जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विविध धाटणीच्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाचा नजराणा सादर करणाºया नाना पाटेकर यांना बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (बिफ) मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आजवर दिलेल्या योगदानाबद्दल नानांना हा पुरस्कार जाहीर झाला करण्यात आला आहे.                  नाना पाटेकर यांच्या समाजकायार्मुळे आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांना बोधिसत्व व्हॉइस आॅफ चेंज लाइफटाइम अचिव्हमेंट हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे  ग्रामीण स्नेह फाउंडेशन आणि बिफच्या आयोजिका स्नेहा रौत्रे यांनी सांगतिले.  ग्रामीण स्नेह फाउंडेशनच्या बिहार एक विरासत या उपक्रमाअंतर्गत प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवामध्ये देशविदेशातील जवळपास ३००० पेक्षा जास्त चित्रपट दाखविले जातात. इराण, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना, बांग्लादेश, कॅनडा, पोतुर्गाल, आॅस्ट्रीया, रशिया, ब्राझील, मेक्सिको आणि अशा विविध देशांतील चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतात. विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट, लघुपट आणि माहितीपट या महोत्सवामध्ये प्रेक्षकांना दाखविण्यात येतात.                      यंदाच्या या बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केतन मेहता, महेश भट्ट, अदूर गोपालक्रिष्णन, शत्रुघ्न सिन्हा, श्याम बेनेगल, स्वरा भास्कर या मान्यवकरांची उपस्थिती असणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठी आणि बॉलिवुड चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर हे नाव खूपच ताकदीचं आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट असे अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहे. त्याचबरोबर त्यांचे समाजकार्यदेखील समाजाला आदर्श घालू पाहणारे आहे.