Join us

नाना पाटेकरांनी व्यक्त केला या घटनेवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 14:09 IST

बंगळूर येथे घडलेल्या घटनेवर सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ...

बंगळूर येथे घडलेल्या घटनेवर सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारने देखील याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तर नाना पाटेकर यांनी देखील या घटनेविषयी आपले मत व्यक्त केले आहे. बंगळुरू घटनेबाबत नाना पाटेकर यांनी तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाºयांना तिथल्या तिथे धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे निकाल लवकर लागले, त्यांना शिक्षा झाली तर अशा गोष्टींवर आळा बसण्यास मदत होईल, असं  देखील अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. नाना नेहमीच समाजात घडणाºया चांगल्या वाईट गोष्टींवर भाष्य करतात. सामाजिक कार्यात देखील नानांचा समावेश असतो. असेच अभिनेता अक्षय कुमारने देखील या घटनेवर संताप व्यक्त करताना खडया शब्दांमध्ये सर्वांना सुनावले होते. अक्षय म्हणाला होता, मीही एका मुलीचा बाप आहे असे म्हणत अक्षयने असे कृत्य करणाºयांवर शब्दाचे आसूड ओढले. विशेष म्हणजे या घटनेनंतर सपाच्या अबू आझमी यांनी मुलींचे कपडे वागणूक यावर आक्षेप घेतला होता, त्याचाही समाचार अक्षयने घेतला. शेवटी तरुणींनी स्वरक्षणासाठी मार्शल आर्टस शिकण्याचा सल्लाही दिला. संपूर्ण व्हिडीओमध्ये अक्षयचा राग स्पष्ट जाणवत होता. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अक्षय केप टाऊनला गेला होता. त्याठिकाणाहून परतल्यानंतर त्याला हे समजले त्यानंतर ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर करत याबाब प्रतिक्रिया दिली.