Join us

नागराज मंजुळे बनले मराठीतील ॲक्शन हिरो, रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 07:00 IST

Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांना तडफदार पोलिसाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’(Ghar Banduk Biryani)चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच रिस्पॉन्स मिळतो आहे.  प्रेक्षक ‘घर बंदूक बिरयानी’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सगळेच कलाकार खास भूमिकेत असून यात विशेष लक्ष वेधून घेत आहेत, ते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे ॲक्शन सीन्स. त्यांचा हा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून याबाबतच्या सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे. मात्र ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये ते पडद्यामागे काम करण्याबरोबरच पडद्यावरही काम करणार आहेत. 

ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे डॅशिंग लूकमध्ये दिसत असून त्यांच्या या लूकवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज आवडला असून आता हा तडफदार पोलीस पाहण्यास प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे नागराज मंजुळेंच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला नवीन ॲक्शन हिरो मिळणार आहे.झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दिप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :नागराज मंजुळे