Join us

नागेश भोसले करतायत 'जुगाड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:44 IST

नागेश भोसलेंवर अशी काय वेळ आली, की त्यांना कोणत्या तरी गोष्टीसाठी जुगाड करावा लागतोय, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. ...

नागेश भोसलेंवर अशी काय वेळ आली, की त्यांना कोणत्या तरी गोष्टीसाठी जुगाड करावा लागतोय, असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण, असं काही नाहीये. तर नागेश भोसले आगामी चित्रपट जुगाडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजवर अनेक चित्रपटांत त्यांना खलनायकाची भूमिका साकारताना आपण पाहिले आहे; पण या चित्रपटात ते एका विनोदी खलनायकाच्या भूमिकेत दिसतील. स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी गावातील दोन पाटील नवीनवीन गोष्टी गावात घेऊन येत असतात आणि दुसर्‍यावर कुरघोडी करून पॉलिटिक्स करीत काय-काय जुगाड करता येतील, यासाठी कसे प्रयत्नशील असतात ते यामध्ये बघायला मिळणार असल्याचे अभिनेता नागेश भोसले यांनी सांगितले. या चित्रपटात भोसलेंसोबत सिद्धेश्‍वर झाडबुके, विजय चव्हाण आदी कलाकार आहेत. मयूर वैष्णव या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, मोहन ठोंबरे चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.