Join us

'माय लव्ह अफेयर विथ...', म्हणत अखेर सई ताम्हणकरनं दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:11 IST

Sai Tamhankar: सई ताम्हणकर हिने लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar)ने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच सईने सोशल मीडियावर लाईफ पार्टनरसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना हिंट दिली होती. दरम्यान आता तर चक्क तिने लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे. 

सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. लाल रंगाची साडी, कपाळावर लाल रंगाची नाजूक टिकली आणि डोळ्यात काजळ घालून सईने सर्वानाच घायाळ केले आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की,  'माय लव्ह अफेयर विथ रेड'. सई ताम्हणकरच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

यापूर्वी सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर तेज येते. या कॅप्शनसोबत तिने हॅशटॅगमध्ये वन, साहेब, दौलतराव मेंशन केले आहेत.

सई ताम्हणकर हिने शेअर केलेल्या व्यक्तीचं नाव अनीश जोग आहे. अनीश जोगचाही सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. तो सिनेनिर्माता असून त्याने आणि काय हवं? वेबसीरिज, गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड, डबल सीट, टाईम प्लीज आणि धुरळा या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :सई ताम्हणकर