Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीतकार हर्षित अभिराजचा सामाजिक उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 14:53 IST

सध्या चंदेरी दुनियेकडे तरूणांची प्रचंड पाऊले पडू लागली आहे. दिग्दर्शक, गायक, संगीतकार होण्यासाठी आजची तरूणाई या क्षेत्राकडे वळू लागली ...

सध्या चंदेरी दुनियेकडे तरूणांची प्रचंड पाऊले पडू लागली आहे. दिग्दर्शक, गायक, संगीतकार होण्यासाठी आजची तरूणाई या क्षेत्राकडे वळू लागली आहेत. या तरूणांईच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा प्ऱयत्न मराठी चित्रपटसृष्ट्रीच संगीतकार हर्षित अभिराज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी नुकतेच  निवारा सभागृह  पुणे  येथे  आपुलकी  फाऊन्डेशनच्या वतीने हर्षित  अभिराज फैंस क्लबची स्थापना केली आली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाविषयी संगीतकार हर्षित अभिराज सांगतात की, समाजातील गरजू आणि  विशेष  गायक कलाकारांना  संगीताचे शिक्षण मिळावे  या उद्देशाने फैंस क्लब ची  स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे संगीताच्या माध्यमातून  मुलगी वाचवा,पर्यावरण वाचवा, देश आणि नाती वाचवा हे सामाजिक संदेशदेखील रसिकापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सध्या आजची तरूणाई गायनाच्या रियालिटी शोमध्ये मोठया प्रमाणावर पाहायला मिळत आहे. मात्र हा शो संपला की, ते फारसे दिसत नाही. अशा नवोदित गायकांना ब्रेक देण्याचा ही आमचा प्ऱयत्न असणार आहे. हर्षित अभिराजने यापूर्वी दूरच्या रानात ,सोडा राया नाद खुळा , माझी मुलगी , बाप्पा मोरया , जननी  जन्मभूमी , भारतमाते वंदन तुला, लहरत लहरत , चितेसारखे  जाळ मला, स्वच्छ पुणे  हरित पुणे अशा लोकप्रिय गीतांसाठी संगीतकार आणि गायनाची जबाबदारी पार पाडली आहे. यासाठी  सदस्य प्रवेश निशुल्क असेल  असे या क्लबचे संकल्पक धनंजय पुरकर आणि विशाल कालानी  यांनी सांगितले. या प्रसंगी विशाल कालानी, रमेश कानडे , संयोगिता बादरायणी, हर्षदा गोखले , राजकुमार  सुंठवाल, श्रीराम जोशी, संजय राजेशिर्के, श्रीरंग धीवर यांनी  हर्षगीत हा कार्यक्रम सादर केला. तसेच सुहास गोखले, किरण खडके आणि अनेक मान्यवर रसिक यावेळी उपस्थित  होते . या कार्यक्रमाचे निवेदन हेमा शर्मा यांनी केले आहे.