Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबई-पुणे-मुंबई' साधीशी कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:58 IST

'मुंबई-पुणे-मुंबई' साधीशी कथा; पण स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे यांचा अभिनय आणि हटके विषय यामुळे प्रेक्षकांच्या मनात उतरली. या दोघांनाच घेऊन ...

'मुंबई-पुणे-मुंबई' साधीशी कथा; पण स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे यांचा अभिनय आणि हटके विषय यामुळे प्रेक्षकांच्या मनात उतरली. या दोघांनाच घेऊन त्याचा सिक्वेल येत आहे. प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास दाखविण्यात येत आहे. पण या चित्रपटाचे जे प्रोमोज येत आहेत त्यावरून 'हम आपके है कौन' ची नक्कल तर नाही ना? अशी शंका वाटू लागली आहे. मूळ 'एमपीएम'मध्ये कलाकारांची भाऊगर्दी नव्हती; मात्र स्वप्नील-मुक्ताने आपल्या अभिनयाने प्रत्येक प्रसंग फुलविला होता. सिक्वेलमध्ये अख्खं वर्‍हाडच असल्याने या दोघांना किती संधी मिळतेय, लव्हस्टोरीचे पॅशन त्यामध्ये येतेय का? याबाबत प्रेक्षकांच्या मनात शंकाच आहेत. 'एमपीएम २' केवळ लग्नाचा व्हिडीओ होऊ नये हीच अपेक्षा.