Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ता बर्वेची 'बंदीशाळा', पहा तिचा डॅशिंग लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:17 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई ३ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देमुक्ता 'बंदिशाळा' चित्रपटात दिसणार धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा 'मुंबई-पुणे-मुंबई ३' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. अखेर त्यांची ही उत्सुकता संपली आहे. ती 'बंदिशाळा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

मुक्ता 'बंदिशाळा' चित्रपटात एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच मुक्ताने महिला दिनाचे औचित्य साधत सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये ती पोलिसाच्या वेशात गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे. तिला डॅशिंग अंदाजात पाहणे कमालीचे ठरणार आहे. चित्रपटाचे शीर्षक व मुक्ताचा लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट कारागृहावर आधारीत असेल असे वाटते आहे. हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

'मुंबई-पुणे-मुंबई ३'च्या जबरदस्त यशानंतर मुक्ताचा 'वेडिंगचा शिनमा' हा संगीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नुकतेच विक्रम फडणवीसच्या 'स्माईल प्लीज' या मराठी सिनेमात सुद्धा मुक्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे समजते आहे.

टॅग्स :मुक्ता बर्वेमुंबई पुणे मुंबई 3