Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताच्या फोटोवर फॅन्स झाले फिदा, म्हणाले ही तर धक् धक् गर्ल ऑफ मराठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 07:15 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचेच नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले.

काही दिवसांपूर्वी मुक्ताने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात मुक्ता खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. धक् धक् गर्ल ऑफ मराठी अशा कमेंट्स मुक्ताच्या फोटोवर देण्यात आल्या आहेत. 

चित्रपटात व्यग्र असतानाही मुक्ताने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. या मालिकेत स्वप्निल जोशी तिच्यासोबत झळकला होता. या मालिकेतील तिची भूमिका, स्वप्निलसोबतचे तिचे ट्युनिंग प्रेक्षकांना खूपच आवडले होते. मुक्ता आणि स्वप्निलच्या जोडीचा मुंबई पुणे मुंबई ३मधील केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. मुक्ता काही दिवसांपूर्वी स्माईल प्लीज सिनेमात दिसली होती.

टॅग्स :मुक्ता बर्वे