Join us

अण्णा हजारे यांच्या हस्ते पार पडला या चित्रपटाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 17:40 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विषयांवर आधारित चित्रपट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक आशयघन असणारे चित्रपट असतात. ...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विषयांवर आधारित चित्रपट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक आशयघन असणारे चित्रपट असतात. त्यामुळे हे चित्रपट मोठया प्रमाणावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अशा नवीन चित्रपटांचा मुहुर्तदेखील खास व्यक्तीच्या हस्ते पार पाडण्याची प्रथाच चित्रपटसृष्टीत पाहायला मिळत आहेत. आता तर मराठी चित्रपटाचे मुहुर्त बॉलिवुड कलाकारांच्या हस्ते पार पडताना दिसत आहे. आता तर थेट एका आगामी मराठी चित्रपटाचा मुहुर्त अण्णा हजारे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आहे. गांव थोर पुढारी चोर असे या चित्रपटाचे नाव आहे.                        महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सध्या राज्यात निवडणुकीचे वारे मोठया प्रमाणात वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशाच राजकीय भानगडीचं इरसाल कोचिंग प्रेक्षकांना गांव थोर पुढारी चोर या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मंगेश मुव्हिज प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या मुहुर्तावेळी निमार्ते मंगेश डोईफोडे, दिग्दर्शक पितांबर काळे ,दिगंबर नाईक, सिया पाटील, प्रेमकिरण, प्रकाश धोत्रे, चेतन दळवी, जयराम नायर, अंशुमाला पाटील, दत्ता थोरात, पराग चौधरी, सुनिल गोडबोले, अरुण खंडागळे, सुरेश देशमुख, सोमनाथ शेलार आणि कांचन भोर आदी कलाकार उपस्थित होते.             दिल्लीत वाजतोय ढोल, गल्लीत नाचतोय मोर आणि आम्ही घेऊन आलोय गांव थोर पुढारी चोर हा भन्नाट विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे.