बहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकरच उडवणार धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 14:47 IST
पहिल्या टीजरपासून ‘शिकारी’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. महेश मांजरेकर प्रस्तुतकर्ता व विजू माने दिग्दर्शक असल्याने ती अधिक वाढली. वेगळया ...
बहुप्रतीक्षित ‘शिकारी’ चित्रपट लवकरच उडवणार धमाल
पहिल्या टीजरपासून ‘शिकारी’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. महेश मांजरेकर प्रस्तुतकर्ता व विजू माने दिग्दर्शक असल्याने ती अधिक वाढली. वेगळया धाटणीच्या २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या चित्रपटाबद्दल प्रस्तुतकर्ता महेश मांजरेकर, दिग्दर्शक विजू माने आणि निर्माते विजय पाटील यांच्याशी मारलेल्या गप्पामहेश मांजरेकर प्रस्तुतकर्तामला पहिल्यापासून वाटत कि जर तुम्हाला धमाका करायचा असेल तर लवंगी लावून चालणार नाही तर त्याला बॉम्बच लागतो आणि तो बॉम्ब चित्रपट शिकारी आज प्रदर्शित झाला आहे. मराठी प्रेक्षक हुशार आहे, तो आता सगळ्या प्रकारच्या चित्रपटांसाठी तयार झालाय आणि सेक्सशी संबंधीत गोष्टी आपण मोकळेपणाने बोलू लागलो आहोत. मग असं असताना बोल्ड सीन्स मराठी चित्रपटात दाखवणे म्हणजे पचनी न पडणारी गोष्ट असा कयास का लावायचा? ‘शिकारी’मधील नेहा खानच्या मादक-मस्त अदांनी तर आधीच सगळ्यांची शिकार झालीय असं मी ऐकतो आहे. सुव्रतचा पहिल्याच सिनेमातील सुरेख वावर आणि विजू मानेचे संयमित आणि सुरेख दिग्दर्शन. चित्रपटाची हाताळणी कठीण होती. एक बोल्ड विषय संवेदनशीलपणे हाताळण्याचा प्रयत्न केलाय. ही एक सेक्स कॉमेडी आहे असा ट्रेलर वरून समज झाला असला तरी त्यातून एक संदेशही दिलाय. एकूणात ती ‘कमर्शियल फिल्म विथ फुल ऑफ एंटरटेन्मेंट’ आहे. ‘शिकारी’ हा चित्रपट हे आपल्या चित्रसृष्टीतील एक वास्तव आहे.‘शिकारी’चे दिग्दर्शक विजू माने म्हणतात,“स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन शिकारी चित्रपटाच्या कथेबद्दल करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर ह्या सिनेमात प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेत असले तरी हा सिनेमा आकार घेत असताना त्यांनी देलेले योगदान खूप खूप मोठे आणि अनुभवसिद्ध आहे. सुव्रत आणि नेहा रूढार्थाने नायक नायिका असले तरी या चित्रपटात प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, कश्मीरा शाह सह आणखी एक सरप्राईज पॅकेज म्हणजे मृण्मयी देशपांडेची यातील अवखळ भूमिका. मराठीतील आघाडीचे विनोदवीर भाऊ कदम, वैभव मांगले आणि भारत गणेशपुरे यांनी चित्रपटाची ‘सेक्स कॉमेडी’ ही ओळख सार्थ ठरविलीय. चित्रपटातील संवाद, गाणी ही आणखी एक जमेची बाजू. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत तर कुमार, श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, जितेंद्र जोशी आदींनी लिहिलेली गाणी अशी ही भट्टी जुळून आली आहे. अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुइली जोगळेकर आदींनी गाणी गायली आहेत.आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या विजय पाटील यांची निर्मिती असलेला ‘शिकारी’ या एकूण काय तर हा मनोरंजनाचा एक तडका आहे पण थोडा झणझणीत आहे असे दिग्दर्शक विजू माने म्हणाले. चित्रपटाचे निर्माते आणि आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील म्हणाले,“शिकारी’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांनी दिग्दर्शित केला असून बहुआयामी व्यक्तिमत्व महेश मांजरेकर यांनी त्याचे सादरीकरण केले आहे. माझे वडील एस आर पाटील यांनी पूर्वी ‘बायको असावी अशी’या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात माझ्या वडिलांनी मध्यवर्ती भूमिका ही केली होती. तो चित्रपट मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांचे अचूक मिश्रण होते आणि आता आज प्रदर्शित होत असलेला शिकारी’ या आमच्या चित्रपटातून आम्ही अशाच प्रकारची संकल्पना मांडली आहे.