Mrunmayee Deshpande Australia Vacation : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या तिच्या एका खास ट्रिपमुळे चर्चेत आहे. महाबळेश्वरच्या शेतात राबणारी मृण्मयी आता थेट ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर भटकंती करताना दिसून आली. मृण्मयीने नुकताच तिच्या ऑस्ट्रेलिया ट्रिपचा एक रंजक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिचं 'चालतं-फिरतं घर' म्हणजेच मोटरहोम प्रेक्षकांना दाखवलं आहे.
मृण्मयी देशपांडे पती स्वप्नील रावसोबत ऑस्ट्रेलिया ट्रीपवर गेली आहे. या प्रवासासाठी त्यांनी कोणतीही लक्झरी हॉटेल न निवडता एका 'मोटरहोम'ला पसंती दिली. मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "सध्या मी ऑस्ट्रेलियात एका कॅम्पिंग ग्राउंडवर आहे. आम्ही इथे एक मोटरहोम भाड्याने घेतले आहे. गेल्या १५ दिवसांपासून आम्ही या गाडीतूनच फिरतोय आणि पुढचे १५ दिवसही आमचा मुक्काम याच गाडीत असणार आहे".
या मोटरहोममध्ये स्वयंपाकघर, भांडी घासण्याची जागा आणि झोपण्यासाठी बेड अशा सर्व सोयी आहेत. मृण्मयीने सांगितले की, "आम्ही रोज घरचेच अन्न बनवून खातोय. कधी नदीकाठी तर कधी घनदाट जंगलात गाडी थांबवून आम्ही स्वयंपाक करतो. समोर हवं ते ठिकाण आणि निसर्ग पाहता येतो, हे या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे". इतकेच नाही तर, गाडीचा मागचा दरवाजा उघडा ठेवून निसर्ग न्याहाळत झोपण्याचा अनुभव विलोभनीय असल्याचेही तिने नमूद केले. मृण्मयीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "या प्रवासात मजा आहे, साहस आहे आणि स्वतःला नव्याने शोधण्याचा एक सुंदर अनुभव आहे".
मृण्मयी नेहमीच तिच्या महाबळेश्वरमधील शेतीचे व्हिडीओ शेअर करत असते, पण तिच्या या आंतरराष्ट्रीय 'कॅम्पिंग' ट्रिपने चाहत्यांची मने जिंकली आहेत. दरम्यान, मृण्मयी ही 'कट्यार काळजात घुसली', 'सुभेदार', 'फर्जंद', 'बोगदा', 'महाराष्ट्र शाहीर', 'शिकारी', 'चंद्रमुखी', 'फतेशिकस्त' अशा अनेक चित्रपटांतील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. तसेच, ती काही रिअॅलिटी शोंचे सूत्रसंचालनही करते. अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Summary : Mrunmayee Deshpande's Australia trip with her husband, Swapnil Rao, is creating buzz. They chose a motorhome over luxury hotels, enjoying home-cooked meals amidst nature. She shared a video of her unique 'mobile home' experience, highlighting the adventure and self-discovery.
Web Summary : मृण्मयी देशपांडे पति स्वप्निल राव के साथ ऑस्ट्रेलिया यात्रा पर हैं। उन्होंने लग्जरी होटल के बजाय एक मोटरहोम को चुना, जहाँ वे प्रकृति के बीच घर का बना खाना खाते हैं। मृण्मयी ने अपने अनोखे 'मोबाइल होम' का वीडियो साझा किया।