Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात असा होता प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंदाज, पुन्हा व्हायरल होतोय खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 12:40 IST

बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. मात्र त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी सांगितलं होतं.

कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय. मृणाल कुलकर्णी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो मृणाल यांच्या लग्नाचा आहे. या फोटोत मृणाल यांना ओळखताही येत नाही. या फोटोला रसिकांकडून बरेच लाईक्स आणि कमेंट्स मिळतायत. १० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. 

मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत. बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. मात्र त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी सांगितलं होतं. लेक विराजस पोटात असताना  त्यांनी ‘श्रीकांत’ नावाची मालिका केली होती. या मालिकेत त्यांनी बंगाली स्त्रीची भूमिका साकारली होती.

साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे सात महिन्यांची गरोदर असेपर्यंत ही भूमिका साकारू शकल्याचे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं. बाळंतपणाच्या निमित्ताने थोडी विश्रांती घेतली आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या आधारे पुन्हा जोमाने कामाला लागल्याचंही त्यांनी म्हटलं होतं  लग्न झालंय आणि मूल आहे हे लपवण्याची कधीच गरज वाटली नसल्याचंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत. आपल्या नॉनस्टॉप काम करण्याचं श्रेय मृणाल यांनी कायम आपल्या सासूबाई आणि पतीला देताता. 

मृणाल यांच्या प्रमाणेच विराजसने देखील अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवत अभिनेता म्हणून स्थान निर्माण केले आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'माझा होशील ना' या मालिकेमुळे विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता अभिनेता बनला आहे. त्याच्या अभिनयाने त्याने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. विराजस हा उत्तम अभिनेता तर आहेच त्याचबरोबर खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शकही आहे. त्याने 'हॉस्टेल डेज' या सिनेमातही काम केले होते.

टॅग्स :मृणाल कुलकर्णी