Join us

वैभव तत्ववादीने शेअर केला 'या' चित्रपटाचा मोशन पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 07:15 IST

अभिनेता वैभव तत्ववादी 'ग्रे' चित्रपटात वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देवैभवचा नवा चित्रपट 'ग्रे' 'ग्रे' चित्रपट पुढील वर्षी होणार प्रदर्शित

हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी सिनेमा 'ग्रे'ची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने शेअर केला होता. त्यात तो एका वेगळ्या भूमिकेत दिसतो आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यात तो वेगवेगळ्या रुपात दिसतो आहे.  

अभिनेता वैभव तत्ववादीने 'फक्त लढा म्हणा' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'सुराज्य', 'कॉफी आणि बरंच काही', 'शॉर्टकट', 'मि. अॅण्ड मिसेस सदाचारी' यांसारख्या मराठी सिनेमात आणि 'हंटर', 'बाजीराव मस्तानी' व 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या हिंदी चित्रपटात तो झळकला आहे. त्याने अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा 'व्हॉट्सअप लग्न' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्याची व अभिनेत्री प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल सांगितले होते आणि दरम्यानच्या काळात त्याने एक फोटो शेअर करून दिग्दर्शकाचा अभिनेता असल्याचे सांगितले होते. आता त्याने सोशल मीडियावर 'ग्रे' या सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले की,'ग्रे चित्रपटाचे मोशन पोस्टर. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावकरने केले असून हा सिनेमा जानेवारी २०१९ला प्रदर्शित होणार आहे.'

'ग्रे' चित्रपटाचा मोशन पोस्टर पाहून चित्रपटात वैभव वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या पोस्टरनंतर या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :वैभव तत्ववादी