Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मिथिला पालकर म्हणतेय मला मीरा म्हणूनच ओळखतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 18:17 IST

मिथिला पालकरचे कप बीट साँग प्रचंड प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावरचे एक महत्त्वाचे नाव म्हणून तिच्याकडे बघितले गेले. ...

मिथिला पालकरचे कप बीट साँग प्रचंड प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावरचे एक महत्त्वाचे नाव म्हणून तिच्याकडे बघितले गेले. मिथिलाने खूपच कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेबसिरिजच्या माध्यमातील ती सुपरस्टार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मिथिलाने कप बीट साँगनंतर गर्ल इन द सिटी या वेबसिरिजमध्ये काम केले. या वेबसिरिजने तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. कारण तिची ही पहिलीच वेबसिरिज प्रचंड गाजली. अनेकांनी ही वेबसिरिज पाहिली आणि या वेबसिरिजचे कौतुकदेखील केले. या वेबसिरिजमध्ये मिथिलाने मीरा ही प्रमुख भूमिका साकारली होती. या वेबसिरिजची कथा मीरा या व्यक्तिरेखेभोवतीच फिरताना आपल्याला पाहायला मिळाली होती. ही भूमिका लोकांमध्ये आज इतकी लोकप्रिय झाली आहे की, प्रेक्षक मिथिलाला मीरा या नावानेच ओळखू लागले आहेत. मिथिला हे तिचे खरे नाव असले तरी तिला प्रेक्षक मीरा या नावानेच हाक मारू लागले आहेत. तिचे खरे नाव मिथिला असल्याचेदेखील अनेकांना माहीत नाहीये. मीरा हीच सध्या तिची ओळख बनली आहे. यामुळे अनेक मजेदार किस्सेदेखील घडत असल्याचे ती सांगते. काही दिवसांपूर्वी एका मेट्रो स्टेशनवरदेखील तिला मीरा या नावानेच बोलवण्यात आले होते आणि गंमत म्हणजे त्या गोष्टीला तिने प्रतिसाददेखील दिला होता. गर्ल इन द सिटी या वेबसिरिजचा पहिला भाग तर प्रचंड गाजला होता. आता या वेबसिरिजचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून प्रेक्षक त्यालादेखील प्रचंड पसंती देत आहेत.