Join us
Daily Top 2Weekly Top 5

मितालीने अशी साजरी केली सिद्धार्थसोबत लग्नानंतरची पहिली होळी, म्हणाली- हे ही बदलेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 12:05 IST

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली आहे.

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली आहे. मितालीने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिचा आणि सिद्धार्थचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघांच्या गालावर गुलाल लावेला दिसतोय. लग्नानंतर ची पहिली धुळवड. घरात बसून खेळलेली पहिली धुळवड. हे ही बदलेल. पण त्यासाठी आज, उद्या, आणखी काही दिवस घरातच थांबावं लागेल. तेव्हढं करूया, असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. चाहत्यांनी ही दोघांचा होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे सिद्धार्थ आणि मितालीने त्यांची पहिली होळी घरातच साजरी केली आहे.  मराठी सिनेसृष्टीत दरवर्षी होळी मोठ्या धुमधड्याक्यात साजरी केली जाते. मात्र  कोरोना व्हायरसमुळे यावर्षी कुठेही होळी साजरी केली जातं नाहीय. 

यावर्षांच्या सुरुवातील जानेवारी महिन्यात मिताली आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती.

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकर