भद्रकाली प्रॉडक्शनची ५३वी नाट्यकलाकृती ‘गेला उडत’ हे नाटक रंगमंचावर आले नि प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रेक्षकांनी या नाटकाला तुफ्फान प्रतिसाद दिला. आता आणखी एक गोड बातमी अशी आहे आपला मारुतात्मज उर्फ सिध्दूला नुकतंच एका पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्काराने ‘गेला उडत’ साठी सिध्दार्थ जाधवला सन्मानित करण्यात आले आहे.
‘गेला उडत’ म्हणत मारुतात्मजने मिळवला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 12:30 IST