Join us
Daily Top 2Weekly Top 5

Married: 'जय मल्हार' फेम सुरभी हांडे अडकली विवाहबंधनात, समोर आले लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 17:30 IST

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

गेल्या काही महिन्यात विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. याच यादीत अभिनेत्री सुरभी हांडेचाही उल्लेख करावा लागेल.  सुरभी हांडेही दुर्गेश कुलकर्णीसोबत विवाबंधनात अडकली आहे. खुद्द सुरभीनेच सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्युज दिली आहे. फोटो शेअर करताच या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे.या फोटोंमध्ये नववधू सुरभीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. 'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून सुरभी म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती. आता सुरभी 'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेत झळकत आहे.

 

टॅग्स :सुरभी हांडेजय मल्हारलक्ष्मी सदैव मंगलम्