Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:30 IST

मराठमोळी अभिनेत्री नुकतीच विवाह बंधनात अडकली असून तिच्या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यात भारतातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात देशात काही लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी नियमावलीत अनलॉक करण्यात आले आहे. अशात काही समारंभांसाठी देखील अटी व नियम आहेत. बऱ्याच लोकांचे कोरोनामुळे लग्न व इतर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यात आता काही कलाकार कमी लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनिंगचे पालन करत लग्न करत आहेत. अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच संगीतकार आनंद ओकसोबत लग्नबेडीत अडकली आहे. तिच्या या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

'संगीत देवबाभळी' या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. संगीतकार आनंद ओक यांच्यासोबत ११ जुलै रोजी विवाह पार पडला. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर म्हणजे अनलॉक २.० मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शुभांगी आणि आनंद ओक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या दोघांनी अगदी छोटासा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम केला. या सोहळ्यात दोघांनीही मास्क लागून विवाह सोहळा संपन्न केला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेली मोजकी मंडळी देखील मास्क घालून सोहळ्याला उपस्थित होते.

शुभांगी सदावर्तेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर प्राजक्त देशमुख दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' नाटकात आवलीची भूमिका साकारत आहे.

या नाटकाला आतापर्यंत खूप पारितोषिक मिळाली आहेत. आनंद ओक यांनी देखील या नाटकाला संगीत दिले आहे. या नाटकाच्या संगीताला देखील अनेक पारितोषिक मिळाली आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या