Join us  

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटचा समर लूक आला समोर, चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 7:00 AM

प्रिया बापट नेहमी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. कधी ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे.मात्र आता प्रियाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने तिचा समर लूक शेअर केला आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

प्रिया बापटने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मी समरसाठी तयार आहे. यात तिने व्हाइट रंगाचा आउटफिट घातले आहे. तिचे हे आउटफिट नेहमी पेक्षा जरा हटके आहे. तिने या आउटफिटवर हाय पोनी आणि कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिचा हा समर लूक चाहत्यांना खूपच भावला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. सिंगापूरमध्ये याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे. याशिवाय 'प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे. तिने नुकतेच या वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. 

टॅग्स :प्रिया बापट