Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 17:20 IST

अनंत मिराशी यांनी दुर्वांची जुडीमधील साकारलेल्या बाळू आपटेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

ठळक मुद्देअनंत मिराशी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी आज पहाटे चारच्या दरम्यान वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं.

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी आज पहाटे चारच्या दरम्यान वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, पुत्र, नात असा परिवार आहे.

मुळचे कोल्हापूरचे असलेल्या मिराशी यांनी अनेक ख्यातनाम संस्थांच्या चित्रपट, मालिका आणि मुख्यत: नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. आय एन टी, दुर्वांची जुडी, रंगमंच, मुंबई, नाट्यसंपदा, रंजन कला मंदिर या नाट्यसंस्थांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. 

रंगमंच, मुंबई या संस्थेच्या नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, असं झालंच कसं?, मी तर बुवा अर्धाच शहाणा या नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. तसेच दुर्वांची जुडीमधील त्यांच्या 'बाळू आपटे'ला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

टॅग्स :मराठी