Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय ती अदा अन् तो डान्स! २६ वर्षापूर्वींच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंत थिरकली, हावभाव पाहून चाहते प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:22 IST

लयभारी!२६ वर्षापूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सनी वेधलं लक्ष

Pooja Sawant Video: मराठी सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप उमटवली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची नाणं खणखणीत वाजवलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हृतिक रोशन आणि प्रीती झिंटाचा साल २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिशन काश्मीर' चित्रपटातील 'बुमरो' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओमधील पूजाचे एक्सप्रेशन्स आणि डान्स मुव्ह्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.या गाण्यावर पूजासोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर ओमने देखील ठेका धरला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. 

दरम्यान, पूजाने बुमरो गाण्यावर डान्स करून लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिची या व्हिडीओमधील एनर्जी थक्क करणारी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर तिच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे, नम्रता संभेराव, हृता दूर्गुळे, श्रुती मराठे तसेच निखिल बने यांसारख्या कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं भरभरुन कौतुक केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pooja Sawant dances to 'Bumbro'; fans charmed by her expressions.

Web Summary : Pooja Sawant's dance video on the popular 'Bumbro' song from 'Mission Kashmir' has gone viral. Her expressions and dance moves are captivating, earning her praise from fans and celebrities alike, including Neha Pendse and Hruta Durgule.
टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ