Sanjay Narvekar: अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. संजय यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. अलिकडेच ते रानटी चित्रपटात पाहायला मिळाले. दरम्यान, संजय नार्वेकरांच्या चित्रपटांची नेहमी चर्चा होतेच, मात्र सध्या ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच त्यांच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर नवीन गाडीचा व्हिडीओ शेअर करुन त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
संजय नार्वेकर यांनी टोयोटो ही नवीन गाडी खरेदी केली आहे. आपल्या कुटुंबियांच्या साथीने त्यांनी या नव्या गाडीची पूजा देखील केली. सोशल मीडियावर नव्या गाडीचा खास व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार संजय नार्वेकर यांन खरेदी केलेल्या कारची किंमत सध्या ते लाखांच्या घरात आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून तसेच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
वर्कफ्रंट
अभिनेते संजय नार्वेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर 'वास्तव', 'खबरदार', 'अगं बाई अरेच्चा', 'खबरदार', 'ये रे येरे पैसा', 'टाइमपास', 'सरीवर सरी', 'चष्मेबहाद्दर', 'नऊ महिने नऊ दिवस' अशा चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.