Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण भेटल्यानंतर कशी वागली? पुष्कर श्रोत्रीने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाला- "ती दोन तास…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:18 IST

दीपिका पादुकोण भेटल्यानंतर कशी वागली? पुष्कर श्रोत्रीने सांगितला 'तो' किस्सा,म्हणाला- "ती दोन तास…"

Pushkar Shrotri: अभिनेता पुष्कर श्रोत्री हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. पुष्करचा मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. पुष्कर अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या आयुष्यातील घडलेले किस्सेसुद्धा शेअर करतो. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पुष्कर श्रोत्रीने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे. 

अलिकडेच पुष्कर श्रोत्रीने नुकतीच 'कॅचअप मराठी' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान पहिल्यांदा भेटल्यानंतर दीपिका कशी वागली होती?याविषयी अभिनेत्याने वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, "एका सांगीतिक कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करतो होता आणि त्यावेळी ती तिथे प्रमोशनला आली होती. दीपिका पादुकोण मला आजही खूप आवडते. त्या कार्यक्रमासाठी तिने दोन तास वेळ दिला होता. त्या दोन तासांत तिने ना मोबाईल पाहिला किंवा मेकअपही केला नाही. ती दोन तास पूर्णवेळ स्टेजवर काय चाललंय ते बघत होती. प्रश्नांना उत्तरं देत होती. तोडकं-मोडकं मराठी बोलत होती. हिंदीतही बोलत होती. शेवटी तिच्याबरोबर डान्स करायची वेळ झाली. तर मी सांगितलं होतं मला तिच्याबरोबर ऑंखों में तेरी... गाण्यावर डान्स करायचा आहे."

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला,"त्यात गंमत अशी झाली की, ती आधीच उंच आणि शिडशिडीत आहे. त्यामध्ये तिने मोठी हिल्सची सॅंडल घातली होती. त्यामुळे मी उड्या मारून मारून डान्स करत होतो, पण मजा आली." असा खास किस्सा अभिनेत्याने शेअर केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pushkar Shrotri recalls Deepika Padukone's humble behavior during a promotional event.

Web Summary : Pushkar Shrotri shared an anecdote about Deepika Padukone's down-to-earth nature during a promotional event. He admired her attentiveness and engagement, even dancing with him despite the height difference.
टॅग्स :पुष्कर श्रोत्रीदीपिका पादुकोणसेलिब्रिटी