Join us

मराठी बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणल्या काही अतरंगी गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 16:29 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. याचवेळेस बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकांची एन्ट्री घरामध्ये झाली. ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. याचवेळेस बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकांची एन्ट्री घरामध्ये झाली. ज्यामध्ये पुष्कर जोग, सरस्वती मालिकेमधील राघव म्हणजे आस्ताद काळे तसेच देविका ही भूमिका साकारलेली आवडती जुई गडकरी, रेशम टिपणीस, मेघा धाडे, आरती सोलंकी, सई लोकूर हे कलाकार होते. घरामध्ये जाण्यापूर्वी या सगळ्यांच्या सामानांची तपासणी झाली. या तपासणीमध्ये काही अतरंगी गोष्टी मिळाल्या. प्रत्येक कलाकार आपल्या फिटनेस बद्दल तसेच आपण कसे दिसतो आहे याबद्दल खूपच सतर्क असतात. बिग बॉसच्या घरामध्ये १०० दिवस रहायचे म्हणजे हे कलाकार सगळ्या छोट्या – मोठ्या गोष्टी घेऊन येणार हे तर नक्कीच ! पण या घरामध्ये तुम्ही आणलेल्या सगळ्याच गोष्टी घरामध्ये घेऊन जाण्यास परवानगी नसते. कलाकारांनी आणलेल्या काही गोष्टी त्यांना घरामध्ये घेऊन जाण्यास मनाई केली गेली तर काही त्यांच्यासोबत पाठविण्यात आल्या.सरस्वती मालिकेतील आस्ताद काळे याने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आणल्या ज्यामध्ये २० हून अधिक परफ्युमचा समावेश होता. तसेच पुष्कर जोग याने भरपूर हेअर प्रोडक्ट आणले होते. याच बरोबर मुलींना सॉफ्ट टॉइज किती आवडतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.जुई गडकरी हिला बिग बॉसच्या घरामध्ये आवडता सॉफ्ट टॉय घेऊन जायचा होता तर ऋतुजा धर्माधीकारीला तिचा एक जुना चमचा घेऊन जाण्याची इच्छा होती, कारण ती दुसऱ्या कोणीही वापरलेला चमचा वापरत नाही. अनिल थत्ते यांनी एक वेगळ्याच प्रकारची टोपी आणली आहे जी त्यांना घरामध्ये घेऊन जायची होती आणि घराचा जो कोणी कॅप्टन होईल त्याला ते ही कॅप देणार होते.अशाप्रकारच्या अनेक गोष्टी या स्पर्धक कलाकारांच्या बॅग मध्ये सापडल्या होत्या.बिग बॉसच्या घरामध्ये यातील काही गोष्टी त्यांना परत मिळतील देखील पण, मोबाईल, टेलिव्हीजन, वर्तमानपत्र, त्यांची घरातील प्रिय मंडळी या व्यतिरिक्त हे कसे रहातील हेच पाहणे रंजक असणार आहे.