Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मर्सिडीज घ्यायची ना'; युजरच्या खोचक कमेंटवर मितालीचं उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 12:55 IST

Mitali mayekar: मितालीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन कार खरेदी केली आहे.

यंदाची दिवाळी अनेक मराठी सेलिब्रिटींसाठी खास ठरत आहे. काही कलाकारांनी त्यांच्या नव्या घरात प्रवेश केला आहे. तर, काहींच्या घरी नव्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. यामध्येच अभिनेत्री मिताली मयेकर (mitali mayekar) हिने नुकतीच नवीन कार खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. मितालीने सोशल मीडियावर या गाडीचे काही फोटो शेअर केले. त्यात काहींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.तर, काहींनी मात्र खोचक कमेंट केली. अशा खोचक कमेंट करणाऱ्याला मितालीने उत्तर दिलं आहे.

माझी लक्ष्मी असं कॅप्शन देत मितालीने तिच्या नव्या कारचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो पाहून अनेकांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला. यामध्येच एका युजरने तिला मर्सिडीज घ्यायची ना, अशी खोचक कमेंट केली. या  युजरला मितालीनेही उत्तर दिलं आहे.

मितालीची ही पोस्ट पाहिल्यावर एका युजरने मर्सिडीज घ्यायची ना, अशी खोचक कमेंट केली. त्यावर, माझं तेवढं बजेट नव्हतं. पण, पुढच्या वर्षी नक्की घेईन, असा सकारात्मक रिप्लाय देऊन मितालीने या युजरची बोलती बंद केली. त्यामुळे सध्या मितालीच्या रिप्लायची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मिताली-सिद्धार्थने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर नवीकोरी कार खरेदी केली. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आहे.

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकरसेलिब्रिटी