Join us
Daily Top 2Weekly Top 5

या मराठी अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी विकल्या होत्या साड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:59 IST

विशाखा सुभेदारने आज छोट्या पडद्यावर तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. विशाखाची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच आवडते. फू बाई फू ...

विशाखा सुभेदारने आज छोट्या पडद्यावर तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. विशाखाची कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच आवडते. फू बाई फू या कार्यक्रमातील तिच्या कॉमिक टायमिंगचे तर चांगलेच कौतुक करण्यात आले. विशाखाने आज चांगलीच प्रसिद्ध मिळवली असली तिच्यासाठी हे यश मिळवणे सोपे नव्हते. विशाखाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे माहेरचे आडनाव शिंदे असून ती लहानपणापासून कळव्यात राहिली आहे. तिचे शिक्षण देखील कळव्यातील शाळेतच झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न महेश सुभेदार यांच्यासोबत झाले. महेश हे डबिंग आर्टिस्ट तसेच अभिनेते आहेत. महेशसोबत लग्न झाल्यानंतर ती अंबरनाथला शिफ्ट झाली. लग्नानंतर विशाखाच्या करियरला एक वेगळे वळण मिळाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 
विशाखाने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी साड्या आणि लिपस्टिक विकल्या आहेत असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे, विशाखा चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी साड्या आणि लिपस्टिक विकत असे. पण जाऊ बाई जोरात या तिच्या पहिल्याच नाटकामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या नाटकानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. एक डाव भटाचा हे तिचे नाटक तर लोकांनी डोक्यावर घेतले होते. फू बाई फू या कार्यक्रमाने तर तिला विनोदी अभिनेत्री म्हणून एक ओळख मिळवून दिली. तिने आजवर अनेक नाटक, चित्रपट, मालिकेत काम केले आहे. आता विशाखा एका हिंदी कार्यक्रमात झळकणार आहे. विशाखा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कपिल शर्माचा नवा कार्यक्रम सोनी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला विशाखाला पाहायला मिळत आहे. विशाखाच्या गेटअपवरून ती या कार्यक्रमात मोलकरणीची भूमिका साकारत असल्याचा अंदाज लावला जात आहे. विशाखाच्या करियरचा हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.  Also Read : विशाखा सुभेदार आणि नम्रता आवटे यांनी नवरा असावा तर असा या कार्यक्रमात शेअर केले त्यांचे सिक्रेट