Join us

"नाटकाचा प्रयोग संपला आणि चाहत्याने थेट लग्नाची मागणीच घातली...", वंदना गुप्तेंनी सांगितला मजेशीर किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:16 IST

अभिनेत्री वंदना गुप्ते  (Vandana Gupte) यांचं नाव मराठी सिनेसृष्टीत मोठ्या अदबीने घेतलं जातं.

Vandana Gupte: अभिनेत्री वंदना गुप्ते  (Vandana Gupte) यांचं नाव मराठी सिनेसृष्टीत मोठ्या अदबीने घेतलं जातं. वंदना गुप्ते गेली अनेक दशकं अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठी सिनेइंडस्ट्रीला त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सध्या त्या 'कुटुंब कीर्रतन' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच त्या एका मुलाखतीमुळे एका चर्चेत आल्या आहे. 

अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एका नाटकाचा किस्सा शेअर केला. 'झुंज' असं त्या नाटकाचं नाव होतं. या नाटकाच्यावेळी त्यांची रखमाची भूमिका पाहून चक्क एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली होती. तो किस्सा सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, "सोलापूरमध्ये झुंज नाटकाचा प्रयोग संपला. मी जिन्स घालून बसले होते. तेवढ्यात समोर ३ अंब्यासिडर गाड्या येऊन थांबल्या. जेवणासाठी जायचं म्हणून मेकअपमन कृष्णा बोरकर बाहेर बसले होते. गाडीतील व्यक्ती बोरकरांना म्हणाले की, 'रखमा कुठंय? 'आत बसल्यात' असं बोरकरांनी म्हटल्यावर ते माझ्याकडे आले आणि मलाच 'रखमा कुठंय?' असा प्रश्न केला."

मग त्या म्हणाल्या, "त्यांना मी म्हणाले की मीच रखमा आहे. माझा मेकअप उतरवल्याने त्यांनी मला ओळखलं नाही, शिवाय मी शुद्ध बोलत असल्याने ते म्हणाले 'बरं'!' म्हणून मग त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली 'माझा पुतण्या आहे त्याच्यासाठी तुम्हाला लग्नाची मागणी घालायला आलोय!'. यावर लगेचच बोरकर म्हणाले की, 'अहो त्यांना २ मुलं आहेत!'...'असूदे की काय हरकत नाही आपण कोर्टात अर्ज टाकू की! आमच्या शेतात लई रानडुक्कर येतात खूप त्रास देतात, अशी खमकी बाई आम्हाला सून म्हणून पाहिजे, असा हा किस्सा होता. या नाटकानंतर माझा आवाजच बदलला, आता कोणी मला फोन करतं तेव्हा मला मॅडम नाही तर सरच म्हणतात." असा मजेशीर किस्सा त्यांनी मुलाखतीत सांगितला. 

टॅग्स :वंदना गुप्तेमराठी चित्रपटसेलिब्रिटी