Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी पंडितचा ‘स्वॅग’! तुफान व्हायरल होत आहेत हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 17:54 IST

तेजस्विनी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंची जबरदस्त चर्चा रंगलीये.

ठळक मुद्देनुकत्याच ‘समांतर 2’ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित दिसली. ही वेबसीरिज चांगलीच गाजली.

तेजस्विनी पंडित  (Tejaswini Pandit) म्हणजे मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे दर्जेदार सिनेमे, विविध नाटक आणि 100 डेजसारख्या मालिका शिवाय समांतर सारखी वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिकंणारी तेजस्विनी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.  सोशल मीडियावर तेजस्विनी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या तिने शेअर केलेल्या अशाच फोटोंची जबरदस्त चर्चा रंगलीये.

इंस्टाग्रामवर तेजस्विनीने स्वत:चे काही डॅशिंग फोटो शेअर केले आहेत.  यलो ट्रॅकसूट, डोक्यावर तिरकी टोपी, पिंक कलरचे शूज या लूकमध्ये ती जाम कूल दिसत आहे. तिचा स्वॅग अगदी वेड लावणारा आहे. ‘Once you show me i am an option, I am gonna show you how many I got.’ हे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. साहजिकच तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय. अगदी मराठी सेलिब्रिटींनीही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.  स्वप्नील जोशी, ऋतुजा बागवे, सिध्दार्थ जाधव या  कलाकारांनी  कमेंट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आता बायो, असं स्वप्निल जोशीनं लिहिलं आहे. बंड्या आता काय कुणाचं ‘Akon’ घेत नाही बाबा... खूप प्रेम, फुल स्वॅग, असं सिद्धार्थ जाधवने लिहिलं आहे. तेजस्विनी एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री तर आहेच पण त्याचसोबत ती एक सक्सेसफुल बिझनेस वुमन देखील आहे. अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित या दोघींनी मिळून ‘तेजाज्ञा’ हा क्लोथिंग ब्रँड चालू केला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  ‘समांतर 2’ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित दिसली. ही वेबसीरिज चांगलीच गाजली.

टॅग्स :तेजस्विनी पंडित