Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेबसिरिज ‘द ऑफिस’मध्ये झळकणार स्पृहा जोशी,अशी असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:47 IST

१३ एपिसोड्सच्या या मॉक्युमेंटरी मालिकेत विकिन्स चावलामध्ये ९ ते ५ असं साचेबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा आहे.

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री  स्पृहा जोशीने रसिकांची मने जिंकली आहेत.‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ आणि ‘उंच माझा झोका’ यांसारख्या मालिका सुरहिट ठरल्या. स्पृहा जोशी हिने मराठी मनोरंजन जगतात स्वत:ची एक स्वतंत्र ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. आता मात्र काही वेगळं करण्याच्या दृष्टीने ती हिंदी मनोरंजन क्षेत्राकडे वळली आहे आणि लवकरच ‘द ऑफिस’ या आंतरराष्ट्रीय सीरिजच्या अधिकृत रुपांतरणात दिसणार आहे. १३ एपिसोड्सच्या या मॉक्युमेंटरी मालिकेत विकिन्स चावलामध्ये ९ ते ५ असं साचेबद्ध काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कथा आहे.  

रोजरोज तेचतेच जगणं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदी परिस्थितीतील या कर्मचाऱ्यांचं आयुष्य यात आहे. स्पृहा ‘द ऑफिस’च्या कसलेल्या कलाकारांसोबत गीता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. गीता ही रीअल इस्टेट डीलर आहे. नायक जगदीप चढ्ढा (मुकुल चढ्ढा) याला त्याचे पहिले घर घेण्यात ती मदत करते. या सीरिजमधून स्पृहा डिजिटल मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण करत आहे.

या मालिकेबद्दल स्पृहा जोशी म्हणाली, “’द ऑफिसच्या’ भारतीय रुपांतरणात काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. ही कथा आणि ती सांगण्याची मॉक्युमेंटरी पद्धत माझ्यासाठी अगदी नवीन आहे. असं यापूर्वी मी कधीच केलेलं नाही. सर्व सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता. प्रेक्षकांनाही ही मालिका आवडेल, अशी आशा आहे.”

‘द ऑफिसच्या’ कलाकारांमध्ये मुकुल चढ्ढा, गौहर खान, रणवीर शौरे, गोपाल दत्त, सयनदीप सेनगुप्ता, समृद्धी दिवाण, प्रियंका सेटिया, अभिनव शर्मा, गाविन मेथलका, प्रीती कोचर, सुनील जेटली, चाइन हो लिआओ, नेहपाल गौतम आणि मयुर बन्सीवाल आदींचा समावेश आहे./

टॅग्स :स्पृहा जोशी