Join us

Aarya Ambekar : टिकलीवरून ट्रोल करणाऱ्यांना आर्या आंबेकरनं सुनावलं, असं दिलं उत्तर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 15:01 IST

Aarya Ambekar: आर्याने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केलेत. पण अनेकांनी हे फोटो पाहून आर्याला ट्रोल करायला सुरूवात केली. टिकलीवरून तिला ट्रोल केलं गेलं. मग काय? या ट्रोलर्सला आर्याने सडेतोड उत्तर दिलं...

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आर्या आंबेकर (Aarya Ambekar) एक गुणी गायिका आहे. अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. गोड गळ्याची, मनमोहक सौंदर्य लाभलेली आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सध्या तिचीच चर्चा आहे. होय, आर्याने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केलेत. पण अनेकांनी हे फोटो पाहून आर्याला ट्रोल करायला सुरूवात केली. टिकलीवरून तिला ट्रोल केलं गेलं. मग काय? या ट्रोलर्सला आर्याने सडेतोड उत्तर दिलं.दिवाळीच्या मुहूर्तावर आर्याने फेसबुकवर साडीतील फोटो पोस्ट केलेत. ‘सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा..., असं तिने हे फोटो शेअर करताना लिहिलं. शिवाय स्वत:हून साडी नेसण्याचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला. जांभळी किनार असलेल्या लालकेशरी रंगाच्या साडीत आर्या कमालीची सुंदर दिसत आहेत. अनेकांनी तिच्या फोटोंचं कौतुक केलं. पण काहींनी या फोटोवरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला.  

 साडी नेसली, पण टिकली का नाही लावली?असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं. ‘खूप खूप सुंदर.पण कुंकू लावायची विसरली की काही वेगळं मनात विचार आला आहे...’ अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.   आर्याची नजर नेमकी या कमेंटवर पडली आणि तिने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं.  ‘टिकली लावली आहे. कृपया झूम करून बघा. मी वेस्टर्न वन पीस घातला तरीही त्यावर काळी छोटी टिकली लावते. कृपया नीट बघून मग कमेंट करा. त्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका...,’असं तिने या ट्रोलरला सुनावलं.  

टॅग्स :आर्या आंबेकरमराठी अभिनेता