Join us

लहान पोरं घाबरतील ना...! श्रुती मराठे ‘मेकअप’मुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 13:57 IST

Shruti Marathe : श्रुतीने काही फोटो शेअर केलेत आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

ठळक मुद्देश्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साऊथमध्ये ती  श्रुती प्रकाश  या नावाने प्रसिद्ध आहे.

श्रुती मराठे (Shruti Marathe) ही मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली श्रुती स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतो. कमेंट्स पाऊस पडतो. पण तूर्तास श्रुतीने असेच काही फोटो शेअर केलेत आणि काही सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. विशेषत: श्रुतीचा मेकअप नेटक-यांना आवडला नाही. मग काय, मेकअपच्या या थराची काही गरज आहे का? चुना लावला का? अशा काय काय कमेंट तिच्या या फोटोवर उमटल्या.

गोल्डन रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट आणि गोल्डन रंगाचाच ब्लेझर अशा डॅशिंग लुकमधील फोटो श्रुतीने शेअर केलेत. या फोटोंमध्ये श्रुतीने व्हाईट कलरचा आय लायनर लावला आहे. हे फोटो पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल.

घारबतील लहान पोरं, अशी कमेंट एका युजरने केली. तर अन्य एकाने बकवास मेकअप अशी प्रतिक्रिया दिली. मेकअपचा मोक्कार थर, काही गरज आहे का ? असं एका युजरने लिहिले.  

श्रुतीने तमिळमधील  प्रेम सूत्र, मराठीतील  सनई चौघडे सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साऊथमध्ये ती  श्रुती प्रकाश  या नावाने प्रसिद्ध आहे. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.  श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती.   

टॅग्स :श्रुती मराठे