Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुजा बागवेने घेतलं स्वप्नातलं घर, Photo शेअर करत म्हणाली, 'मी ठाणेकर!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 08:32 IST

विठ्ठल रखुमाईच्या फोटोने वेधलं लक्ष

Rutuja Bagwe New Home: सध्या मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री एकामागोमाग एक नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी देत आहेत. 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe) ठाण्यात नवं घर घेतल्याची बातमी काल सोशल मीडियावर शेअर केली.'मी ठाणेकर' असं म्हणत तिने नव्या घराची झलक दाखवली आहे. बाल्कनीतून निसर्गाचा सुंदर व्ह्यू देखील दिसत आहे.

ऋतुजा बागवेचं स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय. तिने ठाण्यात फ्लॅट घेतला असून गृहप्रवेशही केला आहे. पारंपारिक पद्धतीने गृहप्रवेशाची पूजा पार पाडत तिने फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाची साडी नेसून ऋतुजा छान तयार झाली होती. तिच्या मागे बाल्कनीतून दिसणार सुंदर व्ह्यू देखील फोटो पाहायला मिळत आहे. हॉलमध्येच पूजा मांडलेली दिसत आहे. स्वकष्टातून घर खरेदी केल्याचा आनंद काही औरच असतो जो ऋतुजाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

ऋतुजाच्या या आनंदाच्या क्षणी तिच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली. सर्वांसोबतचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच आईवडिलांचा कंबरेवर हात ठेवलेला विठ्ठल रखुमाईचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडलाय. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवेसुंदर गृहनियोजनठाणेमराठी अभिनेता