Join us

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या वडिलांना झाला कोरोना, तिलाही जाणवली सौम्य लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 16:23 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची सौम्य लक्षण जाणवली होती, खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली माहिती

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात काही सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील तिला कोरोनाची सौम्य लक्षण जाणवली. तिच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. आता तिच्या कुटुंबातील सर्वजण ठीक असून तिने चाहत्यांनाही काळजी घेण्याची विनंती केली आहे. ऋतुजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली.ऋतुजा बागवे हिने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, दोन आठवडे खूप तणावपूर्ण गेले. कारण बाबांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मलासुद्धा सौम्य लक्षणे होती. बाबा रुग्णालयात आणि मी, आई, बहिण घरी क्वारंटाइन आहोत. औषधोपचार सुरू आहेत. बाबा बरे होऊन घरी परत आले. आता ते घरी विलगीकरणात आहेत आणि आम्ही क्वारंटाइनमध्ये. चौघेही आता बरे आहोत. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की काळजी घेऊनसुद्धा करोना कधी केव्हा कुठे कसा आमच्या भेटीला आला माहित नाही. खूप सतर्क रहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्य ते सगळे उपाय करा. लवकरच ती वेगळ्या भूमिकेतू रसिकांच्या भेटीला येणार आहे शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात तिने भाई कोतवालांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवालची भूमिका साकारली आहे.

एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये उत्तमोत्तम कलाकार दिसणार आहेत. त्यात ऋतुजाची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. ऋतुजाने आतापर्यंत मालिका आणि नाटकांतून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवेकोरोना वायरस बातम्या