Join us

एक नंबर, तुझी कंबर! मराठी अभिनेत्रीने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ताल, अदांनी नेटकऱ्यांना केलं घायाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:00 IST

मराठी अभिनेत्रीने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ठेका, एक्सप्रेशन्सनी जिंकली मनं

Ritika Shrotri Dance Video: हल्ली सोशल मीडियावर एखादं गाण्याचा ट्रेंड सुरु झाला की त्यावर रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. सध्या इंटरनेटवर संजू राठोडचं एक नंबर तुझी कंबर हे गाणं चांगलच ट्रेंडिंगवर आहे. काही दिवसांपूर्वीच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. अगदी मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत तसेच सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रिल्स, व्हिडीओ बनवून थिरकताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर  एका मराठी अभिनेत्रीचा या गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायर होत आहे. ही अभिनेत्री म्हणजे रितीका श्रोत्री. 

गेल्या काही दिवसांपासून संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या गाण्यावर “एक नंबर, तुझी कंबर…”, म्हणत ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच नुकताच या गाण्यावर अभिनेत्री रितिका श्रोत्री या गाण्याची भुरळ पडली आहे. या लोकप्रिय गाण्यावर रितिकाने जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत डान्स केला आहे. "इस पर तो रिल बनता है...", असं कॅप्शन रितीकाने या व्हिडीओला दिला आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी रितीकाचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलंय, "अप्रतिम..." तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, "खूपच सुंदर...".

वर्कफ्रंट

रितीका श्रोत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'मुक्कामपोस्ट बोबिंलवाडी' 'टकाटक', 'बॉईज' आणि 'डार्लिंग' या चित्रपटांच्या माध्यमातून तिने काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ