Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाळ अन् धूर संगटच...! आकाशच्या फोटोवर रिंकूची भन्नाट कमेंट; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 11:32 IST

Akash thosar: आकाशच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या असून यात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिलादेखील कमेंट करायचा मोह आवरला नाही.

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी म्हणजे रिंकू राजगुरु (rinku rajguru) आणि आकाश ठोसर(Akash thosar). आपल्या पहिल्याच सिनेमातून या जोडीने प्रेक्षकांना आपलंस केलं. त्यामुळे आजही ही जोडी चर्चेत येते. रिंकू आणि आकाश यांच्यात चांगली मैत्री असून त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांची मैत्री कायम पहायला मिळते. यात अलिकडेच आकाशच्या फोटोशूटवर रिंकूने कमालची कमेंट केली आहे. या कमेंटमुळे नेटकऱ्यांचं लक्ष  पुन्हा एकदा त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे.

गेल्या काही काळापासून आकाशचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे तो बऱ्याचदा त्याचं फोटोशूट करतो आणि त्यातील काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर करतो. यावेळीदेखील त्याने एक फोटोशूट केलं. यात त्याने ब्लेझर  परिधान केलं असून हे फोटो ब्लॅक अँड व्हाइट स्वरुपात शेअर केले आहे.

आकाशच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या असून यात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिलादेखील कमेंट करायचा मोह आवरला नाही.  रिंकूने त्याच्या पोस्टवर 'ओहहह', अशी कमेंट केली आहे. सोबत तिने फायर इमोजीही पोस्ट केली आहे. रिंकूच्या या कमेंटवर आता चाहतेदेखील प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्याचदा रिंकू आणि आकाश एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. 

टॅग्स :रिंकू राजगुरूआकाश ठोसरसेलिब्रिटीसिनेमा