Join us  

Prajakta Mali : लाडक्या ‘प्राजू’चे बालपणीचे फोटो पाहिलेत का? प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 5:35 PM

Prajakta Mali : सर्वांच्या लाडक्या प्राजूचे अर्थात प्राजक्ता माळीचे बालपणीचे फोटो पाहण्याची मजा काही औरच.... हे फोटो खुद्द प्राजूनेच तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेले आहेत....

Prajakta Mali Childhood Photos : आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच.  सोशल मीडियावर सतत असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अनेक कलाकार स्वत:हून असे फोटो शेअर करत  बालपणीच्या आठवणी सांगतात. अशात सर्वांच्या लाडक्या प्राजूचे अर्थात प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali ) बालपणीचे फोटो पाहण्याची मजा काही औरच.  मराठी चित्रपटांत आणि शो गाजवणारी, आपल्या दिलखुलास हास्याने चाहत्यांच्या मनाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर चाहते जीव ओवाळतात. प्राजूच्या याच चाहत्यांसाठी आम्ही तिचे बालपणीचं फोटो घेऊन आलो आहोत. हे फोटो खुद्द प्राजूनेच तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्राजक्ता माळी  इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक बालपणीचे फोटो आहेत. वेळोवेळी ती असे फोटो शेअर करत असते. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून प्राजक्ता ओळखली जाते. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गेली दोन दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान अभिनयासोबतच प्राजक्तानं आता आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिने स्वत:चा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

प्राजक्ताला अगदी लहानपणापासून डान्सची आवड होती. म्हणून वयाच्या 6व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर जेव्हा ती 13 किंवा 14 वर्षांची होती तेव्हा स्टार प्लसवरील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा तिने जिंकली देखील होती. त्यानंतर तिने अनेक नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये तसेच डान्स शोमध्ये भाग घेतला होता.

प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती  जुळून येती रेशिम गाठी,  नकटीच्या लग्नाला यायचं हं  या मालिकांमध्ये काम केलं.

 जुळून येती रेशीमगाठी  या मालिकेत तिनं साकारलेल्या  मेघा देसाई  या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला  खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती  महाराष्ट्राची हास्यजत्रा  या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजन