Join us
Daily Top 2Weekly Top 5

Love in the air म्हणत पल्लवी पाटील दाखवली नव्या गाण्याची झलक, सिद्धार्थ मेननसोबत रंगली केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:07 IST

नव्या गाण्यामध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनेता सिद्धार्थ मेनन सोबत रोमाँटिक अंदाजात दिसणार आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून तिच्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांना प्रभावित केले आहे. ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून तिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर नवीन मलिका नवा गडी नवं राज्य प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. त्याचसोबतच पल्लवी . ‘तेरी मेरी दास्तान’ या हिंदी गाण्याच्या अल्बममध्ये अभिनेता सिद्धार्थ मेनन सोबत रोमाँटिक अंदाजात दिसणार आहे. 

‘तेरी मेरी दास्तान’ अल्बम मधील गाणं काश्मीरमधील हटके लोकेशनवर चित्रीत केलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे तरकाश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छाया लेखक अमोल गोळे यांनी केले आहे. अब्दुल शेख याने गायलेल्या या गाण्याला विदुर आनंदयांचे संगीत लाभले आहे.

 या गाण्यात सिद्धार्थचा शांत तर पल्लवीचा काहीशा चुलबुला अंदाज पहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रेमकथेतअसणारा ‘प्रेम’ हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक निराळीगोष्ट असते अशीच प्रेमात पाडणारी ‘लव्हेबल’ गोष्ट या अल्बम मधून उलगडणार आहे.

 तेरी मेरी दास्तान च्या शूटिंग अनुभवाबद्दलबोलताना सिद्धार्थ आणि पल्लवी सांगतात की, ३ डिग्री तापमानात आम्ही हे शूटपूर्ण केलं असून ते आम्ही खूप एन्जॉय केलं. गाण्याची ही रोमँटिक सफर प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :पल्लवी पाटीलसेलिब्रिटी