Deepak Dewoolkar: मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड. आपल्या चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचे पती देखील अभिनेते आहेत. त्याचं नाव दीपक देऊळकर असून कृष्णा या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बलरामाची भूमिका साकारली होती. त्यांनी 'लेक लाडकी या घरची', 'सपने साजन के', 'लेक लाडकी या घरची' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
अनेक गाजलेल्या मालिका तसंच चित्रपटांमधून काम केलेले दीपक देऊलकर आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. मात्र, कालांतराने त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. नुकतीच दीपक देओलकर यांनी 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांनी आयुष्यातील काही अनुभवांवर भाष्य केलं. यावेळी मुलाखतीमध्ये त्यांना मराठीमध्ये हुकलेल्या संधी कोणत्या? त्याबद्दल विचारण्यात आलं.तेव्हा दीपक देओलकर म्हणाले, "माझ्याकडून नाही नाही म्हणता १०-१२ चित्रपट गेले. एक चित्रपट होता ज्यामध्ये मी आणि विक्रम गोखले भावांची भूमिका करणार होतो. तारखा चाळीस दिवस सलग कोल्हापूरला घेतल्या गेल्या. मुंबईचाच निर्माता त्या चित्रपटाचं शूट कोल्हापूरला करणार होता. त्यावेळी आराधना चित्रपटाच्या डबिंगवेळी आम्ही एकत्र भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले की, 'आपण सोबत जायचं हा!' मी म्हटलं कुठे? तर त्यांनी सांगितलं 'अरे, तारखा तुझ्याकडे आल्या नाही का?' मला कोणाचं नाव घेऊन बदनाम करायचं नाही. मग विक्रम गोखले म्हणाले, 'अरे...! मला तर सांगितलं कन्फर्म आहे.'शिवाय मलाही तेव्हा कन्फर्म सांगितलं होतं."
यापुढे त्यांनी सांगितलं की,"मग मी त्या निर्मात्याला फोन केला. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, 'नाही. शेड्यूल थोडं पुढे गेलं आहे. मी तुला नक्की सांगतो.' त्यावेळी तो खूप गोड बोलला. आणि मी फोन ठेवला. त्यानंतर विक्रम गोखलेंनी थेट त्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला विचारलं. मग तो निर्माता म्हणाला, 'नाही असं झालंय. दीपकच्या तारखा जुळत नसल्यामुळे आम्ही त्याच्या जागी दुसऱ्याला रिप्लेस केलं आहे.'
विक्रम गोखलेंनी काढलेली खरडपट्टी
त्या निर्मात्याच बोलणं ऐकून विक्रम गोखलेंनी त्याला सुनावलं आणि ते त्याला म्हणाले, "माझ्या बाजूला आता दीपक देऊलकर उभा आहे. त्या मुलाचे तुम्ही ४० दिवस घेतले आणि आता नाही म्हणायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मग विक्रम गोखलेंनी त्या चित्रपटाचं मानधन सुद्धा परत केलं आणि सिनेमाही सोडला."
Web Summary : Deepak Dewoolkar recounts being replaced in a film despite confirmation. Vikram Gokhale confronted the producer about it. Upset by the deceit, Gokhale returned his fees and left the project in solidarity.
Web Summary : दीपक देउलकर ने फिल्म में रिप्लेस किए जाने का खुलासा किया। विक्रम गोखले ने निर्माता से सवाल किया। धोखे से नाराज होकर, गोखले ने अपनी फीस वापस कर दी और एकजुटता दिखाते हुए परियोजना छोड़ दी।