Marathi Actress Neha Joshi: अभिनेत्री नेहा जोशी ही मराठी कलाविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.अनेक मराठी नाटक, सिनेमे, मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता तिने आपलं लक्ष हिंदी मनोरंज उद्योगात वळवलं आहे.विशेष म्हणजे अजय देवगणच्या दृष्यम २ मधील तिच्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने 'दृश्यम २' मध्ये अजय देवगण आणि तब्बूसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
नुकतीच नेहा जोशीन लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला मराठी इंडस्ट्रीतील राजकारणामुळे चांगले कलाकार कुठेतरी मागे पडलेत का असं वाटतं याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, फक्त मराठी इंडस्ट्रीमध्येच नाहीतर बऱ्याच ठिकाणी मागे पडले आहेत. पण, मला हिंदींमध्ये मला असा अनुभव आला की तिथे लोकांनी माझ्या कामाचा आदर केला. मी पहिली मालिका केली, तोपर्यंत त्यांना ही कोण मुलगी आहे हे माहितचं नव्हतं. पण, त्याच्यानंतर मी त्याच चॅनलबरोबर चार ते पाच वर्ष काम केलं. त्यांनी मला खूप आदराने वागवलं. तो माझ्या कामाबद्दलचा आदर होता.
पुढे मराठीमध्ये कलाकारांना आदर दिला जात नाही का असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा नेहा म्हणाली, मला वाटतं आपण अशी माणसं आहोत की आपण गोष्टींना गृहित धरतो. आदर नाही, असं नाही. तो असेल पण कशाला दाखवायचा. समोरची व्यक्ती आपलीच आहे, चांगलीच आहे. असं समजलं जातं. पण, असेही काही कलाकार आहेत जे हे सगळं चांगल्या पद्धतीने सांभाळून काम करतात.
'दृश्यम २' मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
मुलाखतीत नेहाने 'दृश्यम २' मध्ये अजय देवगणसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली,"मी दृश्यमचं जेव्हा शूट केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे इतके मोठे मोठे कलाकार आहेत. पण, मी जेव्हा सीन करायचे तेव्हा ते माझ्याबरोबर सहकलाकार म्हणून ते काम करायचे. सीनचं लाईटिंग सुरु होतं आणि मार्कवर उभी होते. त्यावेळी अजय देवगण मला म्हणाले आपण सीन वाचूया का? मी हो म्हणाले आणि त्यांच्याकडे जाऊ लागले.तेव्हा ते म्हणाले तुम्ही लायटिंग मार्कवर उभे आहात ना. तुम्ही तिथेच उभ्या राहा. ते उठले आणि त्यांची खुर्ची घेऊन माझ्याजवळ आले. ही खूप मोठी गोष्ट आहे असं नाही उलट ही सामान्य गोष्ट आहे. हे सगळं ते करतात म्हणून आज ते त्या ठिकाणी पोहोचले आहेत. कारण, तसं बघायला गेलं तर, त्यांनी माझ्याबरोबर सीन वाचला नसता, तरी त्यांना काही फरक पडला नसता."
मग तब्बूबद्दल अभिनेत्री म्हणाली," मी काहीतरी प्रश्न विचारत होते. तेव्हा तब्बू तिथे बसल्या होत्या.तर मला वाटलं आपण आता काही बोलायला नको, म्हणून मी गप्प बसले. तर त्या म्हणाल्या की तुम्ही काहीतरी बोलत होता. तो प्रश्न माझ्याही मनात होता. माझं त्यांच्याबरोबर थोडं काम होतं. एखादा सीने होता.पण, कामाला आदर मिळाला आणि सहकलाकार म्हणून त्या माझ्याकडे बघत होत्या. त्यात एक गोष्ट अशी आहे आपण त्यांच्यासमोर कसे वागतो हेही महत्त्वाचं आहे." असं अभिनेत्रीने सांगितलं.
Web Summary : Marathi actress Neha Joshi recounts her positive experience on 'Drishyam 2' set. She highlights Ajay Devgn and Tabu's respectful treatment, emphasizing their collaborative approach and genuine appreciation for her work as a co-star.
Web Summary : मराठी अभिनेत्री नेहा जोशी ने 'दृश्यम 2' के सेट पर अपने सकारात्मक अनुभव को बताया। उन्होंने अजय देवगन और तब्बू के सम्मानजनक व्यवहार पर जोर दिया, उनके सहयोगात्मक दृष्टिकोण और सह-कलाकार के रूप में उनके काम की वास्तविक सराहना पर प्रकाश डाला।