Join us

त्याने तिचा हात धरला अन्...मुक्ता बर्वेने शेअर केला किंग खानसोबतचा 'तो' Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:23 IST

शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा बादशाह आहे.

आज बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते जगभरात आहेत. 'पठाण' आणि 'जवान' च्या यशानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणखी भर पडली आहे. आज किंग खान ५८ वा वाढदिवस साजरा करत असून त्याच्यावर सगळीकडूनच शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेने एक जुना व्हिडिओ शेअर केलाय . यामध्ये शाहरुख तिचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन येताना दिसतोय आणि तिला गालावरही Kiss करताना दिसत आहे. 

शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा बादशाह आहे. पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही तो महिलांना ज्याप्रकारे आदर देतो ते कौतुकास्पद आहे. मुक्ता बर्वेने तिचा मराठी सिनेमा हृदयांतर च्या प्रमोशनवेळेसचा एक व्हिडिओ शेअर केलाय. विक्रम फडणीस यांच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये शाहरुखही सहभागी झाला होता. शाहरुख हातात क्लॅपबोर्ड घेऊन माध्यमांना पोज देताना दिसला. तर एका इव्हेंटमध्ये शाहरुख खान मुक्ताचा हात धरुन तिला स्टेजवर घेऊन जाताना दिसत आहे. तसंच स्टेजवर येताच तो तिला गालावर किसही करताना दिसतो. मुक्तासाठी हे क्षण नक्कीच खास असणार. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आज संपूर्ण सोशल मीडिया हे शाहरुखमय झालंय. वाढदिवस आणि डंकीचा टीझर यामुळे तो चर्चेत आहे. सगळेच त्याच्यासाठी पोस्ट करत आहेत. डंकी 22 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इरानी यांचीही मुख्य भूमिका आहे. राजकुमार हिरानींच्या या सिनेमात शाहरुख पहिल्यांदाच झळकमार आहे. 

टॅग्स :मुक्ता बर्वेशाहरुख खानमराठी अभिनेता