Join us

मिताली मयेकरने हा फोटो केला शेअर, पण.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 14:56 IST

मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात मितालीचा हा फोटो आहे. या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहेत.

मिताली सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. काही दिवसांपूर्वी मितालीने एक स्वतःचा हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती व्हाईट रंगाचा वनपिस परिधान केला आहे.एवढेच नाही तर तिच्या फोटोमध्ये तिचे क्लीवेज दिसत आहेत. 

यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. 'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असा हा मितालीचा सेक्सी आणि बोल्ड लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला असला तरी तिच्या काही चाहत्यांना मितालीचा हा फोटो अजिबात आवडलेला नाही. या फोटोवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळतंय. तुर्तास मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात मितालीचा हा फोटो आहे.  या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहेत.

 सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचा या दोघांचा साखरपुडा झाला आहे.  साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.कोणताही कार्यक्रम असो, कॉफी घेणे असो किंवा मग सिनेमाला जाणं असो दोघंही त्याचे फोटो रसिकांसह सोशल मीडियावर शेअर करत. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत गेल्याचे पाहाला मिळाले होते. 

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकर