Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : मराठमोळ्या अभिनेत्रीने रस्त्यावरच्या आजींकडून खरेदी केले मातीचे दिवे, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 13:54 IST

अभिनेत्री गौरी नलावडेने आजींकडून दिवाळीसाठी मातीचे दिवे खरेदी केले आहेत. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करत आहेत. बॉलिवूडकरांच्या दिवाळी पार्ट्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिवाळीत कंदील, लाईट्स आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई केली जाते. दिव्यांच्या प्रकाशात सगळीकडे लखलखाट पाहायला मिळतो. अनेकजण दिवाळीत Made In India ला पसंती देत दिवे, कंदील खरेदी करतात. मराठमोळ्या अभिनेत्रीनेही रस्त्यावर दिवे विकणाऱ्या आजींकडून खरेदी केली आहे. 

अभिनेत्री गौरी नलावडेने आजींकडून दिवाळीसाठी मातीचे दिवे खरेदी केले आहेत. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत गौरी आजींकडून दिवे खरेदी करताना दिसत आहे. गौरीने दिवे घेतल्यानंतर आजींनी खूश होऊन तिला दोन दिवे आणखी दिल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. "या दिवाळीसाठी मी हाताने तयार केलेल्या दिव्यांना पसंती दर्शविली. आज्जी खूश, मी खूश," असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. 

गौरीच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुकही केलं आहे. "अप्रतिम मॅडम अशीच सदैव काळजी आपुलकी राहू दे", असं एकामे म्हटलं आहे. "ग्रेट वर्क", "खरंच अप्रतिम" अशा कमेंट करत गौरीचं कोतुक केलं आहे. 

स्वप्नांच्या पलिकडले मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरीने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. गौरीने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'गोदावरी'सिनेमांतही गौरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

टॅग्स :दिवाळी 2023सेलिब्रिटींची दिवाळीगौरी नलावडे